Tarun Bharat

कोकण रेल्वे मार्गावर आढळला तरुणाचा मृतदेह

Advertisements

प्रतिनिधी/रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीतील पानवल येथे 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणांचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पानवल रेल्वे ट्रॅक वर छिन्न विच्छिन्न अवस्थेत तुकडे झालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. सुमित राजेश सावंत (20, मजगाव, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे ट्रॅक च्या पुलाच्या पलीकडे देहाचे तुकडे तुकडे दिसून आले. याबाबतची फिर्याद मंदार पवार (35, खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिवा सावंतवाडी एक्स्प्रेसच्या धडकेत या तरुणाचा मृत्यू झाला.

दरम्यान या तरुणाच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याची परिसरात उलट सुलट चर्चा सुरू होती. ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. काही दिवसापूर्वी आरटीओ कार्यालय परिसरात दोन तरुणांनी रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच घटना घडल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.

Related Stories

‘जैतापूर’साठी 3 आंतरराष्ट्रीय कंपन्यांची हातमिळवणी

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत आठ गावांमध्ये बस सेवा सुरू

Archana Banage

पुरुष बचत गटाकडून केळी लागवडीची किमया

Patil_p

‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून नात्यांची गुंफण!

Patil_p

कोराना लसीचा ‘नो वेस्ट’ केरळ पॅटर्न रत्नागिरीत राबवणार

Patil_p

शिरगांव मत्स्य महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाला 1.78 कोटी मंजूर

Patil_p
error: Content is protected !!