Tarun Bharat

ब्राझीलमध्ये बोल्सोनारो पराभवाच्या छायेत

Advertisements

देशात सार्वत्रिक निवडणूक ः डाव्या पक्षाचे नेते लूला डा सिल्वा यांचे पारडे जड

वृत्तसंस्था/ ब्राझिलिया

ब्राझीलमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीच्या निकालाने जगातील चौथ्या क्रमांकाची लोकशाही असलेल्या ब्राझीलचे नेतृत्व कोण करणार हे निश्चित होणार आहे. उजव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे वर्तमान अध्यक्ष जेयर बोल्सोनारो आणि डाव्या विचारसरणीचे नेते लुइज इनासियो लुला डा सिल्वा यांच्यात अध्यक्षपदासाठी मुख्य चुरस आहे. बोल्सानारो यांचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.

याचदरम्यान बोल्सोनारो यांनी स्वतःच्या समर्थकांना हिंसेसाठी चिथावणी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे 22 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्राझीलमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बोल्सोनारो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. ट्रम्प यांच्याप्रमाणेच बोल्सोनारो हे समर्थकांना निवडणुकीत पराभव झाल्यास निकाल मान्य न करण्याचे आवाहन करत आहेत. बोल्सोनारो यांचे समर्थक या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत मतदारांना धमकावत होते.

बोल्सोनारो यांनी स्वतःच्या 4 वर्षांच्या अध्यक्षकाळात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनुकरण केले होते.  ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांनी मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. याचप्रकारे बोल्सोनारो निकालापूर्वीच गैरप्रकारांचा दावा करून स्वतःच्या समर्थकांना चिथावणी देत आहेत.

निवडणूक संचालन समितीचे पदाधिकारी हे लूला यांचे समर्थक आहेत. लूला यांच्यासोबत मिळून या पदाधिकाऱयांनी मतदानयंत्रात गडबड केल्याचा आरोप बोल्सोनारो यांनी केला आहे. ब्राझीलमध्ये 1996 पासून ईव्हीएमद्वारे मतदान होत आहे.

बुलेटप्रूफ जॅकेटसह प्रचार

ब्राझीलमध्ये राजकीय द्वेषाने टोक गाठल्याने बोल्सोनारो आणि लूला हे दोघेही बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून प्रचार करताना दिसून आले. बोल्सोनारो यांच्या समर्थकाने अलिकडेच लूला यांच्या समर्थकाची हत्या केली होती. ब्राझीलमध्ये गुन्हेगारी टोळय़ांचे प्रमाण अधिक असल्याने गुन्हय़ांचे प्रमाणही अधिक आहे. निवडणुकीदरम्यान मोठे राजकीय पक्ष हिंसा घडवून आणण्यासाठी आणि मतदारांना स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी या टोळय़ांचा वापर करत असतात.

Related Stories

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

स्पेनमध्ये निदर्शने

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 10 लाखांचा टप्पा

datta jadhav

रशियन वृत्तपत्राचे संपादक नोबेलचा लिलाव करणार

Patil_p

भारतीय गुप्तहेराला जर्मनीत तुरुंगवास

datta jadhav

पॅराशूटवीराचे थेट किचनमध्ये लँडिंग

Patil_p
error: Content is protected !!