वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी लॉर्डस् मैदानावर 2 जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला या कसोटीत सहभागी होता येणार नाही. आयपीएल स्पर्धेत तो सध्या राजस्थान संघाकडून खेळत असून या संघाचा अंतिम सामना गुजरात टायटन्सविरुद्ध रविवारी अहमदाबादमध्ये होत आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने बाद फेरीतील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्यानंतर दुसऱया सामन्यात बेंगळूर संघाने लखनौचा पराभव केला. दरम्यान या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या एलिमनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बेंगळूरचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या दौऱयात कसोटी मालिकेपूर्वी दुसरा सरावाचा सामना खेळणार आहे. लॉर्डस्च्या कसोटीसाठी क्रिकेट न्यूझीलंडने टीम साऊदी, जेमिसन, वेग्नर, हेन्री आणि अझाज पटेल यांची संघात निवड केली आहे.