वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या डेगंगामध्ये रविवारी तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट झाला आहे. घरात निर्मितीकार्य सुरू असताना हा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनुसार इमारतीत देसी बॉम्बचा स्फोट झाला आहे. तृणमूल नेत्याच्या घराचे काम सुरू असताना हा प्रकार घडला आहे. घरातील जिन्याखाली काही बॉम्ब ठेवण्यात आले होते. कामगारांनी या बॉम्बना स्पर्श करताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दोघनांही विश्वनाथपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी घरातून तीन बॉम्ब हस्तगत केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. राज्यातील निवडणुकांमध्ये देशी बॉम्बचा वापर विरोधकांना धडा शिकविण्यासाठी केला जात असतो. मागील आठवडय़ात उत्तर 24 परगना येथील तृणमूल नेते सुकुर अली यांना पोलिसांनी शस्त्रास्त्रासह पकडले होते.