तरुण भारत

कराचीत बॉम्बस्फोट; 3 ठार, 13 जखमी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

कराचीमधील सदर भागात गुरुवारी रात्री उशिरा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 3 जण ठार झाले असून, 13 जण जखमी आहेत. (bomb blast in karachi three killed, thirteen-injured) काहींची प्रकृती गंभीर असून, त्यांना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीमधील सदर नावाच्या भागात रात्री अकराच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या कचराकुंडीजवळ एक दुचाकी लावण्यात आली होती. या दुचाकीमध्ये बॉम्ब सेट करण्यात आले होते. हल्लेखोरांनी टाईमरने हा स्फोट घडवून आणला. हा स्फोट एवढा जोरदार होता, आजूबाजूला असलेली वाहनेही उद्धवस्त झाली. आजूबाजूच्या हॉटेल आणि घरांच्या काचाही फुटल्या. तसेच स्फोटात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 13 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे बाजारपेठेत प्रचंड गोंधळ उडाला होता.

दरम्यान, या स्फोटात दोन किलो स्फोटके आणि अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Related Stories

कोरोनाची धास्ती : जळगावमध्ये 11 ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू

Rohan_P

सीरम इन्स्टिट्यूट लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करणार

Abhijeet Shinde

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी पार

datta jadhav

येत्या 1 ऑगस्टपासून मुंबईत ‘घरोघरी लसीकरण उपक्रमा’चा शुभारंभ

Rohan_P

चारचाकी पलटी होऊन सहाजण जखमी; दोघे गंभीर

Sumit Tambekar

सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू: आशिष शेलार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!