ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाटणा येथील सिव्हिल कोर्टात (Patna Civil Court) शुक्रवारी स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात कोर्टात असणारे तीन पोलीस जखमी झाले आहेत. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी तात्काळ पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सुधीर कुमार असे आहे. (Patna Civil Court Blast)
मिळालेल्या माहितीनुसार, कदमकुआन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पटेल हॉस्टेलवर छापा टाकून बॉम्ब जप्त केला होता. शुक्रवारी दुपारी निरीक्षक बॉम्ब घेऊन दिवाणी न्यायालयातील अभियोग कार्यालयात पोहोचले. यादरम्यान अचानक हातातच बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्बस्फोटानंतर (Bomb blast) दिवाणी न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला आणि धुराचे लोट पसरले. कोर्ट (Court) परिसरात बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. कोर्टात पुरावे म्हणून बॉम्ब घेऊन येणारे पोलीस या स्फोटात जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, बॉम्बशोधक पथक, एफएसएल टीम आणि श्वान पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. सर्व बाजू तपासल्या जात आहेत. पुरावा म्हणून बॉम्ब न्यायालयात आणल्याचे सांगण्यात आले. जेणेकरून फिर्यादीला त्याची पडताळणी करता येईल. परंतु, बॉम्बस्फोट झाला. यात बॉम्ब आणणारा हवालदार जखमी झाल्याची माहिती मिळाली.