Tarun Bharat

सहा रेल्वे स्टेशनसह मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

ऑनलाईन टीम / डेहराडून :

लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार या सहा रेल्वे स्टेशनसह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी रुरकी रेल्वे स्टेशन अधीक्षकांना धमकीचे पत्र मिळाले आहे. हे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचे सांगितले आहे.

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, रुरकी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक एलके वर्मा यांना 7 मे रोजी संध्याकाळी एक मिळाले. या पत्रात 21 मे रोजी लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार या 6 रेल्वे स्टेशनसह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच 23 मे ला हरिद्वारमधील मनशा देवी, चंडी देवी आणि अन्य धार्मिक स्थळांनाही बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. जैशचा एरिया कमांडर सलीम अन्सारीच्या नावाने हे पत्र आले आहे.

दरम्यान, स्टेशन अधीक्षकांनी आरपीएफ आणि जीआरपी तसेच मुरादाबाद डीआरएम अजय नंदन यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यानंतर डेहराडून ते हरिद्वारपर्यंत सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांकडून यासंदर्भात तपास सुरू आहे.

Related Stories

‘मातोश्री’त घुसण्याचा प्रयत्न करणारा शेतकरी मुलीसह पोलिसांच्या ताब्यात

prashant_c

सोलापुरात कोरोनाने घेतला 99 वा बळी, आज 64 रुग्णांची भर

Archana Banage

राहुल नार्वेकर याच्याविरोधात मुंबई न्यायालयाचे वॉरंट

Abhijeet Khandekar

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध

datta jadhav

अफगाणिस्तान : मशिदीवरील आत्मघातकी हल्ल्यात 46 ठार

datta jadhav

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

Tousif Mujawar