तरुण भारत

पुणे रेल्वेस्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

ऑनलाईन टीम / पुणे

पुणे रेल्वेस्थानकावर दोन बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Bomb-like objects at Pune railway station) सध्या त्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक पोहोचलेल आहे. दोन नंबरच्या फ्लॅटफॉर्मवर ही घटना घडली आहे. त्यामुळे १ आणि २ नंबर प्लॅटफॉर्म रिकामा करण्यात आला आहे. तसेच स्टेशनच्या चारी बाजूस काहीकाळ नागरिकांची वर्दळ आणि वाहतूक काही काळ थांबवण्यात आलेली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याचे समजताच पुणे पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे स्टेशनची पाहणी केली. यावेळी आढळलेली वस्तू ही जिलेटिन नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

Advertisements
पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू

दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाने आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू निकामी करण्यासाठी मोकळ्या जागेत नेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे स्थानक परिसराचा ते आढावा घेत आहेत. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिकही घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत.

Related Stories

दिल्लीत मागील 24 तासात 2,260 नवीन कोरोना रुग्ण; संसर्ग दर 3 टक्क्यांवर

Rohan_P

झारखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

जगभरात 15 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

केरळ सेट परीक्षेत धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकांतून तब्बल ४० प्रश्न

Abhijeet Shinde

कामावर असताना मल्याळम भाषा वापरु नये; दिल्ली सरकारची हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात चौदा पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!