Tarun Bharat

इराणहून चीनला जाणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

इराणमधील महान एयरलाइन्सच्या एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. हे विमान इराणहून चीनच्या दिशेने जात आहे. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. यानंतर हे विमान भारतात दिल्ली किंवा जयपुर येथे लँड करण्याची परवानगी मागण्यात आली होती परंतु परवानगी नाकारली असून भारतीय हवाई दल सतर्क झाले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या विमानावर लक्ष ठेवलं जातंय.

तेहरान येथील विमानळावरून या विमानाने उड्डाण केले होते. महान एयरलाइन्सचे हे विमान लाहौर एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने बॉम्बने उडवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना दिली. हे विमान भारतात दिल्ली किंवा जयपूर येथे लँड केले जावे यासाठी परवानगी देखील मागण्यात आली होती. मात्र, ही परवानगी नाकारण्यात आली. सध्या हे विमान चीनी हवाई क्षेत्रात पोहचले असून काही ते सुरक्षित उतरल्याची माहिती मिळत आहे.

विमानात बॉम्ब असल्याची अफवा देखील असू शकते. लाहौर एटीसीने दिलेल्या महितीनंतर भारतीय हवाईदल अलर्ट झाले. ही घटना अशा वेळेला घडली जेव्हा राजस्थानच्या जोधपुरयेथे लाइट कॉम्बैट हेलीकॉप्टर म्हणचेच LCH हे वायुदलाल हस्तांतरित केले जात होते. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल वीआर चौधरी या सोबत अनेक मोठे अधिकारी देखील उपस्थित होते. फ्लाइट रडारवर २४ तासांच्या उड्डाणाची माहिती घेतली जात आहे. दिल्ली-जयपुर हवाई क्षेत्रात हे विमान आल्यावर विमानाची ऊंची ही कमी झाली होती. याच वेळी भारतीय हवाई दलाने कारवाई करण्यासाठी दोन सुखोई विमान तैनात केले होते.

हे ही वाचा : मिलिंद नार्वेकर ठाकरेंसोबतच!

Related Stories

कर्नाटक: भाजप विधिमंडळाची ७ वाजता बैठक, नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा

Archana Banage

Dasara Melava : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी सोडलं मैदान

Archana Banage

शहीद जवानाचे बलिदान तरुणांसाठी प्रेरणादायी-तहसीलदार दिनेश पारगे

Abhijeet Khandekar

पक्षप्रमुख नाव जाहीर करतील- संजय राऊत

Archana Banage

दिल्लीसह परिसरात पावसाचा हाहाकार

Patil_p

सिटबेल्टविना न सुरू होणारी कार

Patil_p
error: Content is protected !!