ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच ऑफर करणाऱ्या बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, जयसिंघानीला आता मुंबईत आणण्यात येणार आहे.
अनिल जयसिंघानी हा क्रिकेट बुकी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, तो मागील सात वर्षांपासून फरार आहे. त्याची मुलगी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी मागील 16 महिन्यांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तिने वडिल अनिल जयसिंघानी यांना एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर केली होती. तसेच त्यांना त्यासाठी धमकी दिली होती.
अमृता फडणवीस यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हालवली. तपासादरम्यान, जयसिंघानीला गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याला आजच मुंबईला आणण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.
अधिक वाचा : राऊतांना ‘ते’ ट्विट भोवलं; बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल