वृत्तसंस्था /नवी दिल्ली
किया 2 जून 2022 पासून भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. याचे नाव ईव्ही6 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर आहे. या कारचे बुकिंग सुरु झाले आहे. सदरची कार ही 3 लाख रुपये भरुन 12 शहरांमधील 15 निवडक विक्रेत्यांकडे बुकिंगकरीता उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटवर या नवीन इलेक्ट्रिक कारचे बुकिंग करता येणार आहे.
भारतात फक्त 100 युनिट्ची विक्री होणार
बुकिंग सुरु करण्याच्या काही मिनिटात कारची संपूर्ण विक्री होण्याची शक्यता आहे. इव्ही 6सह कंपनीने ईव्ही 6 लाइट, ईव्ही6 एअर, ईव्ही वॉटर आणि ईव्ही6 अर्थ नावाने ट्रेडमार्क करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. यामध्ये ईव्ही6 इलेक्ट्रिक कारच्या वेगवेगळय़ा मॉडेलची नावे असू शकतात.
सिंगल चार्जमध्ये 528 किमीपर्यंतची रेंज
इव्हीसोबत 77.4 किलोवॅट आर बॅटरी पॅक दिला आहे. ज्यामुळे कारच्या चार चाकांना ताकद मिळणार आहे. तसेच दमदार 58 किलोवॅट आर बॅटरी पॅकही किया ईव्ही6 ला मिळणार आहे. यासह बॅटरी 18 मिनिटात 10-80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. यात दमदार बॅटरीची रेंज 528 किमी पर्यंत राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.