Tarun Bharat

मारुतीच्या नव्या ब्रिझ्झाचे बुकिंग सुरू

30 जूनला होणार लाँच ः 6 एयर बॅगसह विविध सुविधा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील सर्वात मोठी मोटार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने आपल्या नव्या ब्रिझ्झा या गाडीचे लाँचिंग करण्याचे निश्चित केले असून येत्या 30 जूनला ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. सदरच्या गाडीच्या बुकिंग प्रक्रियेला सुरूवात झाली असल्याचेही समजते. 6 एयर बॅगसह येणारी ही गाडी किया सोनेट व वेन्यू या गाडय़ांना आगामी काळात टक्कर देणार आहे.

सदरची गाडी बुक करण्यासाठी संभाव्य ग्राहकांना कंपनीच्या एरिना शोरूममार्फत किंवा यांच्या संकेतस्थळावर संपर्क साधून 11 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

2016 मध्ये लाँच केलेल्या सुव्ह गटातील विटारा ब्रिझ्झाची जागा येणारी नवी गाडी घेईल. नवी ब्रिझ्झा ही गाडी मागच्या व्हर्जनवर आधारीत प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली असल्याचे समजते. परंतु नव्या बांधणीसह अंतर्गत सजावटीत बदल मात्र या गाडीत दिसणार आहे. डॅशबोर्ड डिझाइनमध्ये फरक करण्यात आला असून अंतर्गत बदलही सुखावह करण्यात आल्याचे समजते.

या गाडय़ांना देणार टक्कर

सदरची नवी ब्रिझ्झा गाडी 30 जूनला लाँच होणार असली तरी किंमत त्याचदिवशी जाहीर केली जाणार आहे. नवी ब्रिझ्झा हय़ुंडाई वेन्यु, किया सोनेट, टाटा नेक्सन, निस्सान मॅग्नाइट आणि रेनॉ किगर या गाडय़ांना टक्कर देईल, असे सांगितले जात आहे.

या असतील सुविधा

w 9 इंच टचस्क्रीन

w प्रुझ कंट्रोल

w ऑटोमेटीक क्लायमेट कंट्रोल

w हेड अप डिस्प्ले

w सनरुफ

Related Stories

कियाने विकल्या 14 हजारहून अधिक कार्स

Amit Kulkarni

वाहन विक्री वाढीने उत्साहाचे वातावरण

Amit Kulkarni

सोनालिका ट्रक्टर्स विक्रीत वाढ

Patil_p

पियाजिओची वाहन विक्री एप्रिल-नोव्हेंबरमध्ये 15 हजारांवर

Amit Kulkarni

एप्रिलमध्ये किरकोळ वाहन विक्री 37 टक्क्यांनी वाढली

Amit Kulkarni

किया मोटर्सची ‘कार्निवल’ होणार भारतात लाँच

prashant_c
error: Content is protected !!