पणजी, दि. 3 – गोव्यात आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर पुरुष होऊन गेले. गोमंतकीय लढय़ाचे स्फूर्तिस्थान दीपाजी राणे, योगिराज सोहिरोबानाथ आंबिये, ज्ञानमार्गोपदेशक कृष्णमभट बांदकर, बक्षिबहाद्दर जिवबादादा केरकर, भजनी सप्ताहाचे आद्य प्रवर्तक ब्र. जगन्नाथबुवा बोरीकर अशी एकापेक्षा एक अशी अनेक रत्ने या गोमंतभूमीत जन्मली. भगवान परशुरामाने निर्मिलेल्या या भूमीप्रति असलेले त्यांचे कर्तव्य, त्यांची नि÷ा प्रेरणास्त्राsत बनून राहिली आहे. गोमंतभूमीच्या जडण-घडणीसाठी आपले जीवन वाहिलेल्या अशा या थोर पुरुषांचे कार्य युगानयुगे दीपस्थ?भ बनून राहणार आहे.
अशा या थोर विभुतींचे फोटो, त्यांची माहिती विद्यार्थांच्या डोळय़ांसमोर सतत रहावी, व महापुरुषांचा आदर्श त्यांनी चोखाळावा, या हेतूने मातृभूमी सेवा प्रति÷ान, गोवाने या थोर महापुरुषांचे फोटो व माहिती असलेल्या वह्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या वह्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दित्या जातील. इच्छुकांनी या वह्यासांठी 08322444088 किंवा 08322438501 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे मातृभूमी सेवा प्रति÷ानतर्फे कळविण्यात आले आहे.