मुंबई
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा समभाग शेअरबाजारात नवी उंची गाठण्यामध्ये यश प्राप्त करु शकला आहे. 5 वर्षानंतर कंपनीचा समभाग उच्चांकावर पोहचला आहे.मंगळवारी कंपनीचा समभाग एनएसईवर इंट्रा डेदरम्यान 5 टक्के वाढत 157 रुपयांवर पोहचला आहे. या समभागाने गेल्या 6 महिन्याच्या
अवधीत 51 टक्के इतका परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. मे 2017 नंतर कंपनीचा समभाग नव्या उंचीवर पोहचत असल्याचे दिसून येते आहे.