जीवनात लोक चित्रविचित्र गोष्टी करत असतात. काही लोकांना स्वतःसोबत प्रयोग करण्याचा छंद असतो. याद्वारे ते स्वतःला इतरांपेक्षा वेगळे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. एका व्यक्तीने स्वतःच्या शरीरावर अनेक प्रयोग केल्याने आता त्याच्याकडे पाहिले तरीही भय वाटू लागते. स्वतःचे कानच त्याने कापून घेत त्याने अतिरेक केला आहे.
या व्यक्तीचे नाव मायकल फारो डो प्राडो असून तो ब्राझीलमध्ये राहतो. कोरोना महामारीमध्ये मास्क लावण्याची अनिवार्यता संपल्याचा आनंद व्यक्त करत त्याने स्वतःचे दोन्ही कानच कापून घेतले आहेत. मायकलचा चेहरा पाहिल्यावर अनेक जण घाबरतात. त्याने स्वतःच्या शरीरावर अनेक टॅटू काढून घेण्यासह अनेक ठिकाणी पियर्सिंगही करविले आहे. स्वतःच्या दातांनाही त्याने विचित्र प्रकारे कस्टमाइज करविले आहे. सोशल मीडियावर त्याने स्वतःचा नवा लुक शेअर केल्यावर सर्वजण हैराण झाले. या छायाचित्रात तो कानाशिवाय दिसून येत आहे.


मायकलला रस्त्यावर चालताना पाहून लोक थांबतात. लोकांनी त्याला ‘ह्युमन सॅटन’ असे टोपणनाव दिले आहे. एका राक्षसाचे चित्र असावे असे मला वाटत असल्याचे मायकल सांगतो. तर त्याचे कुटुंब आणि त्याचे मित्र नेहमी त्याला पाठिंबा देण्यास प्रेरित करत असतात.
पेशाने टॅटू आर्टिस्ट
मायकल स्वतः पेशाने टॅटू आर्टिस्ट आहे. स्वतःची छायाचित्रे आणि मनातील भावना शेअर करण्यासाठी तो इन्स्टाग्रामचा वापर करतो. त्याच्या इन्स्टावर 1 लाख 26 हजार जण फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर त्याला टीकाटिप्पणीलाही तोंड द्यावे लागत असते.