जन्मापासून असाध्य रोगाने पिडित… चालणं-फिरणंही अशक्य… वडील व्यसनाधीन… आई अशिक्षित… आणि शिवाय दोन्ही मूत्रपिंडे निकामी, अशी कोणाची स्थिती असेल तर त्याला जगणेही कठीण आहे. पण, दिव्या सचदेवा नामक 25 वषीय तरुणीने याही स्थितीवर मात करत एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. हा जणू एक चमत्कारच आहे. आता तिला अमेझॉन या कंपनीत सन्माननीय नोकरी मिळाली आहे. निर्धार आणि परिश्रमाचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
दिव्या सचदेवा तिच्या व्हिलचेअरवरून जेव्हा तिची पदवी स्वीकारण्यासाठी पोहोचली, त्यावेळी विद्यापीठाच्या सभागृहात टाळय़ांचा कडकडाट झाला. सर्वांनी उभे राहून तिला मानवंदना दिली. एका जन्मापासून न्युरलटय़ूब डिफेक्ट या असाध्य विकाराने पिडित असणाऱया युवतीने एमबीएची पदवी घेण्याची कदाचित इतिहासातील पहिलीच वेळ असावी, असे तिच्याबाबत बोलले जाते.
आयआयएमच्या कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रमांतर्गत बेंगळूरच्या ऍमेझॉन कंपनीने तिची कॅटलॉग स्पेशालिस्ट म्हणून निवड केली आहे. तिला वर्क फ्रॉम होम करण्याची अनुमती देण्यात आली आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती देव आणि आपल्या आईला देते. वडिलांनी व्यसनापोटी दोघींचाही त्याग केलेला आहे. तरीही आईने तिच्या सर्व मर्यादांवर मात करत मुलीच्या शिक्षणासाठी जे करता येणे शक्मय होते ते सर्व काही केले. मुलीनेही आईच्या प्रयत्नांना न्याय दिला. त्यामुळे आज तिच्या जीवनात सोनेरी दिवस निर्माण झाले आहेत. कठीण परिस्थितीशी झुंजणाऱया सर्वांसाठीच तिचे हे उदाहरण आचरणात आणण्यासारखे आहे.