बेंगळूर
बेंगळूरमधील स्मार्ट मोबिलिटी कंपनी बाऊन्स यांनी आपल्या इ 1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाचा शुभारंभ 18 एप्रिलपासून करण्याचे निश्चित केले आहे. या संदर्भातील माहिती बाऊन्स कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक विवेकानंद हल्लेकेरे यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. ज्या ग्राहकांनी सदरची गाडी बुक केली आहे, त्यांच्याशी कंपनी लवकरच संपर्क साधून गाडीच्या वितरणाचा कार्यक्रम हाती घेणार आहे.