बँकॉक : विश्व मुष्टियुद्ध मंडळातर्फे (डब्ल्यूबीसी) बुधवारी येथे आयोजिलेल्या आशिया काँटिनेन्टल मुष्टियुद्ध लढतीत भारताचा मुष्टियोद्धा शिवा ठकरनने मलेशियाच्या आदिल हाफिजवर तांत्रिक नॉकआऊटवर विजय मिळविला.
सुपर मिडलवेट गटात खेळणारा शिवा ठकरनने बुधवारच्या या लढतीत मलेशियाचा दक्षिण-पूर्व आशियाई स्पर्धेतील पदक विजेता आदिल हाफिजचा तांत्रिक गुणावर पराभव केला. पंचांनी ही लढत आठव्या फेरीत थांबवित शिवा ठकरनला विजयी घोषित केले.