Tarun Bharat

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा बचावला पण आई दगावली..!

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :

आपल्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचे समजताच दुर्दैवी मातेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. खनगाव येथील शांता निलजकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून मुलगा बचावला, मात्र हा धक्का सहन न झाल्याने आईचा मात्र मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास जाधवनगर येथे बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. गवंडी कामगार सिद्राय लक्ष्मण निलजकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते किरकोळ जखमी झाले होते. सिद्राय यांना तात्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले. जाधवनगर परिसरात बिबट्याचा शोध मात्र रात्री उशीरापर्यंत सुरू होता.
सिद्राय यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांची आई शांता यांना समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून त्या सावरू न शकल्यामुळे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. शांता यांचा अचानक मृत्यू झाल्याने खनगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Related Stories

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱया तरुणाला पोलीस कोठडी

Patil_p

कोरोनावरील लसीचा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल!

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमधील जलशुध्दीकरण केंद्र बंद

Patil_p

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा

Amit Kulkarni

बेळगाव विमानतळावर सुरक्षेची खबरदारी

Patil_p

मराठा प्राधिकरणाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!