ऑनलाईन टीम / तरुण भारत :
टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान खान (Sheezan Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
तुनिषा शर्मा ‘अलिबाबा : दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे चित्रीकरण वसई पूर्वच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी चित्रीकरणाच्या ठिकाणी असलेल्या मेकअप रुममध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी 5 वाजता सहकाऱयांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अधिक वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक होणार; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
शिझान खानने प्रेमसंबंध तोडल्याच्या नैराश्यातून तुनिषाने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या आईने वालिव पोलिसात दिली होती. या फिर्यादीवरुन वालिव पोलिसांनी शिझानला अटक केली आहे. शिझानविरुद्ध भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.