Tarun Bharat

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरमध्ये ब्रेसवेलचा समावेश

वृत्तसंस्था/ बेंगळूर

2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघातील इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्स जखमी झाल्याने या संघाच्या फ्रांचायजीनी न्यूझीलंडचा अष्टपैलू मिचेल ब्रेसवेलला बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.

31 मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी गेल्या डिसेंबर महिन्यात आयोजिलेल्या क्रिकेटपटूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर विल जॅक्सला 3.2 कोटी रुपयांच्या बोलीवर खेदी केले होते. दरम्यान चालू महिन्याच्या प्रारंभी मीरपूर येथे झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडच्या जॅक्सला स्नायू दुखापत झाली. ही दुखापत बरी होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने तो या आयपीएल स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता दुरावली. दरम्यान बेंगळूर संघाने न्यूझीलंडच्या ब्रेसवेलशी नुकताच नवा करार केला आहे. ब्रेसवेलने आतापर्यंत 16 टी-20 सामन्यात फलंदाजीत 113 धावा तर गोलंदाजीत 21 बळी घेतले आहेत. बेंगळूर संघाने ब्रेसवेलला 1 कोटी रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले असल्dयाचे समजते. बेंगळूरचा आयपीएल स्पर्धेतील सलामीचा सामना 2 एप्रिलला मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे.

Related Stories

ग्रीकच्या सिटसिपेसचे आव्हान समाप्त

Patil_p

आयसीसी कसोटी मानांकनात बुमराह नववा

Patil_p

आयएसएलमधील कोलकाता डर्बी आज वास्कोच्या टिळक मैदानावर

Patil_p

हंसिनी राजन विजेती

Patil_p

इंग्लंडचा ओली स्टोन नॉटिंगहॅमशायरशी करारबद्ध

Patil_p

महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची बाधा

Patil_p