Tarun Bharat

ब्रह्मेशानंदाचार्यांना ‘विश्व शांती’ पुरस्कार प्रदान

Advertisements

दुबई येथील विश्व शांती संमेलनात शांती, एकता व मानवतेच्या कार्याची दखल

पणजी : समाजात शांती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणे, धर्माचे ज्ञान मूल ग्रंथांप्रमाणे मार्गदर्शन करणे, ही धार्मिक लोकांची जबाबदारी आहे. शांती बाहेरून नाही तर आतून ती प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. तरच बाहेरून त्याचे दर्शन घडेल. लोकांनी माणुसकी जपण्यासाठी पुढाकार घ्यावा. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, दुबई हे शांतता प्रस्थापित करण्याचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होत आहे, असे प्रतिपादन आध्यात्मिक धर्मगुरु पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

 विश्व शांती दिनाच्या निमित्ताने ‘जातीयवाद थांबवा आणि शांतता स्थापित करा’ या घोषवाक्मयाखाली काऊंसिल फॉर युनिव्हर्सल पीस या संस्थेद्वारे विश्व शांती संमेलन 2022 चे आयोजन वर्ल्ड टेड सेंटर, दुबई येथे नुकतेच करण्यात आले होते.

दुबईत संपन्न झालेल्या या संमेलनात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती, एकता व मानवतेसाठी पूज्य स्वामीजींनी केलेल्या क्रांतिकारक दिव्य कार्याची दखल घेऊन काउंसिल फॉर युनिव्हर्सल पीस या संस्थेद्वारे सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना ‘विश्व शांती पुरस्कार’ बहाल करून गौरवान्वित करण्यात आले.

याप्रसंगी शेख उबील अल मक्तूम, खालेद अल मैना, रशीद अल नुरी, डॉ. डॉनी थोमस, अ‍Ÿड. ब्राह्मीदेवीजी सचिवा-इंटरनॅशनल सद्गुरु फाउंडेशन गोवा, डॉ. स्वप्निल नागवेकर – अध्यक्ष युएई काऊंसिल दुबई तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज महनीय मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

ओझर-पोडोशे येथे बेकायदेशीर भूखंड पाडण्याचे काम जोरात

Omkar B

निवृत्त अधिकाऱयाच्या सेवावाढी मुद्दावर फोंडा पालीकेची खास बैठक गाजली

Patil_p

केपेच्या कायापालटासाठीच भाजपात प्रवेश : कवळेकर

Amit Kulkarni

बेकायदा बांधकामाबाबत गोवा गृहनिर्माण मंडळाकडून कारवाईचा इशारा

Amit Kulkarni

विविध ठिकाणी माटोळी बाजारात खरेदीसाठी गर्दी

Patil_p

शांतादुर्गा किटलकरीणला नवीन विजयरथ अर्पण

Amit Kulkarni
error: Content is protected !!