Tarun Bharat

‘हृदय’ झिरो ट्रॅफिकमधून आणले केएलई रुग्णालयात..!

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय धारवाड येथील एसडीएम रुग्णालयातून आज सकाळी झिरो ट्रॅफिकमधून बेळगावच्या केएलई रुग्णालयात आणण्यात आले. धारवाडहून आज शुक्रवारी पहाटे 4 वाजता हृदय घेऊन निघालेली ऍम्ब्युलन्स पहाटे 5 वाजता बेळगावातील केएलई रुग्णालयात पोहोचली.

गिरीश सोमप्पा कुरी ( वय ३९ )हे कोप्पळ जिल्ह्यातील कुनीकेरी तांडा येथील रहिवासी. त्यांचा नुकताच धारवाडमध्ये दुचाकी चालविताना अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी गिरीशचा ब्रेन डेड झाल्याचे सांगितले. गिरीश एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम करत होता. त्याला पत्नी आणि तीन मुले आहेत.

डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयव दान करण्याबाबत सांगितले. याला कुटूंबियांनी सहमती दर्शवली. केएलई रुग्णालयात गिरीशचे हृदय एका रुग्णावर यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले.

Related Stories

प्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवडणुकीत दोन्ही पँनेलला समान जागा

Patil_p

यरगट्टीजवळ बेकायदा तांदूळसाठा जप्त

Amit Kulkarni

उड्डाणपुलावरील पथदीप दिवसरात्र सुरूच

Amit Kulkarni

ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांचे निधन

Patil_p

कर्नाटक पोस्ट विभागात 2 हजार 443 जागांसाठी भरती

Omkar B

तालुक्यात पुन्हा घोणस अळी निदर्शनास

Omkar B
error: Content is protected !!