Tarun Bharat

चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी ब्रॅव्हो

वृत्तसंस्था/ चेन्नई

2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी विंडीजचे अष्टपैलू ड्वेन ब्रॅव्होची नियुक्ती करण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या प्रँचायजीने ही माहिती दिली.

ड्वेन ब्रॅव्हो यापूर्वी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत होता. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे गोलंदाज प्रशिक्षक म्हणून लक्ष्मीपती बालाजी कार्यरत होते. पण त्यांनी काही वैयक्तिक अडचणीमुळे ही जबाबदारी सोडल्याने त्यांच्या जागी ड्वेन ब्रॅव्होची नियुक्ती करण्यात आली आहे. 2011 पासून ब्रॅव्हो हे चेन्नई सुपरकिंग्ज संघामध्ये विविध जबाबदाऱया सांभाळत आहेत. 2011, 2018 आणि 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अजिंक्मयपद मिळविणाऱया चेन्नई सुपरकिंग्ज संघामध्ये ब्रॅक्होचा समावेश होता. आयपीएल स्पर्धेत ब्रॅव्होने चेन्नई संघाकडून 144 सामन्यात 1556 धावा जमविल्या असून 168 बळी मिळविले आहेत.

Related Stories

श्रेयस अय्यरच्या वनडेमध्ये जलद 1500 धावा

Amit Kulkarni

18 किंवा 19 सप्टेंबरला आयपीएलची नवी सुरुवात

Patil_p

भारत-इंग्लंडचे सर्व खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह

Patil_p

टोकियो ऑलिंपिकसाठी स्थानिक 10 हजार शौकिनांना परवानगी

Patil_p

जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये अभिज्ञाला रौप्य पदक

Archana Banage

भारतीय क्रिकेटपटूंचा जवानांना सॅल्युट

Patil_p