Tarun Bharat

टी-20 मध्ये 600 बळी मिळविणारा ब्रॅव्हो पहिला गोलंदाज

Advertisements

वृत्तसंस्था/ केनिंग्टन, यूके

विंडीजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्रॅव्हो हा टी-20 प्रकारात 600 बळी नोंदवणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत त्याने नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना ओव्हल्स इनव्हिन्सिबल्स संघाविरुद्ध त्याने हा विक्रम नोंदवला. डावातील 89 व्या चेंडूवर त्याने एका अप्रतिम चेंडूवर अष्टपैलू सॅम करणचा त्रिफळा उडविला. करणने 39 चेंडूत 60 धावांची आतषबाजी करीत आपल्या इनव्हिन्सिबल संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि तोच सामनावीराचा मानकरीही ठरला. ब्रॅव्होने 20 चेंडू गोलंदाजी करीत 29 धावांत 2 बळी मिळविताना 8 निर्धाव चेंडू टाकले. फलंदाजीत मात्र तो शून्यावर बाद झाला. या सामन्यात सुपरचार्जर्सने 100 चेंडूत 7 बाद 157 धावा जमविल्या. ऍडम लीथने 33 चेंडूत सर्वाधिक 79 धावा फटकावल्या. त्यानंतर ओव्हल्स इनव्हिन्सिबल्सने 97 चेंडूत 7 बाद 158 धावा जमवित विजय साकार केला.

 ब्रॅव्होने 545 सामन्यात 8.21 च्या इŸकॉनॉमी रेटने व 24.12 धावांच्या सरासरीने 600 बळींचा टप्पा गाठला. 23 धावांत 5 बळी ही त्याची या प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी विश्वचषक टी-20 स्पर्धेत विंडीजचे आव्हान समाप्त झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

या प्रकारात सर्वाधिक बळी नोंदवणाऱयांत तो पहिल्या स्थानावर असून अफगाणचा स्पिनर रशिद खान (466 बळी) दुसऱया, विंडीजचा स्पिनर सुनील नरेन (457) तिसऱया, द.आफ्रिकेचा स्पिनर इम्रान ताहीर (451) चौथ्या, बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन (418) पाचव्या स्थानावर आहे.

Related Stories

उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा सहभाग

Patil_p

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंच्या सरावाला सोमवारपासून प्रारंभ

Patil_p

इंडियन वेल्स स्पर्धेत अमेरिकेचा फ्रिट्झ विजेता

Patil_p

युनूस खान पाकच्या फलंदाज प्रशिक्षकपदी

Patil_p

बांबोळीत आज मुंबई सिटीची लढत एससी ईस्ट बंगालशी

Patil_p

सुरेश रैनाला पितृशोक

Patil_p
error: Content is protected !!