Tarun Bharat

ब्राझील-क्रोएशिया उपांत्यपूर्व लढत आज

विश्वचषक फुटबॉल : अर्जेन्टिना-नेदरलँड्स यांच्यात होणार दुसरी उपांत्यपूर्व लढत

वृत्तसंस्था/अल रय्यान, कतार

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीचा पहिला टप्पा संपला असून आता उरलेल्या आठ संघांत उपांत्य फेरी गाठण्यासाठी झुंज सुरू होणार आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी ब्राझील व क्रोएशिया यांच्यात रात्री 8.30 वाजता होणार आहे तर त्यानंतर अर्जेन्टिना व नेदरलँड्स यांच्यातील दुसरा सामना मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल.

ब्राझील व क्रोएशिया यांच्यात होणारी ही एकंदर पाचवी व विश्वचषक स्पर्धेतील तिसरी लढत आहे. ब्राझीलने दक्षिण कोरियावर 4-1 अशी एकतर्फी मात करून शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविले. या सामन्यात त्यांनी मध्यंतरालाच 4-0 अशी आघाडी घेताना पूर्वार्धात टिटे यांच्या या संघाने पूर्ण वर्चस्व राखले होते. पंधरा सेकंद असताना कोरियाचा एकमेव गोल पाइक स्यूंग हो याने नोंदवला होता. क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना जपानवर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला. निर्धारित वेळेत व अर्धा तासाच्या जादा वेळेतही 1-1 अशी बरोबरी झाली होती. पण शूटआऊटमध्ये 2018 च्या उपविजेत्या क्रोएशियाने बाजी मारत आगेकूच केली. त्यांचा गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोविकने अप्रतिम बचाव करीत जपानच्या तीन पेनल्टी निष्फळ केल्या.

याआधी ब्राझील व क्रोएशिया यांच्यात झालेल्या चार लढतीपैकी शेवटची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यात ब्राझीलने 2-0 असा विजय मिळविला होता. मध्यंतरानंतर उतरलेल्या नेमार व स्टॉपेज टाईममध्ये रॉबर्टो फर्मिनो यांनी गोल नोंदवले होते. रशियात झालेल्या मागील विश्वचषक स्पर्धेत ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले होते तर क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीत त्यांना फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. प्रेंडली सामन्यात खेळलेला देजान लोवरेन हा एकमेव खेळाडू सध्या क्रोएशिया संघात आहे. क्रोएशियाच्या बॅकलाईनमधील पाच खेळाडूंची नवी बांधणी सुरू असून लोवरेनला 20 वर्षीय जोको ग्वार्डिओलची साथ मिळणार आहे. त्याने आजवर अप्रतिम प्रदर्शन केले आहे. मिडफिल्डमधील स्टार लुका मोड्रिक तोच या सामन्यात त्यांचा नेता असेल.

ब्राझील संघातही गेल्या चार वर्षात बरेच बदल झाले असून त्यांच्या फायरपॉवरला सध्या तोड नाही. नेमारसमवेत व्हिनिसियस ज्युनियर, राफिन्हा, रिचार्लीसन या संघात आहेत. याशिवाय बेंचवरही प्रतिभावान खेळाडू आहेत. एकमेकांविरुद्धच्या लढतींचे रेकॉर्ड पाहता क्रोएशियाची बाजू वरचढ ठरणारी नाही. ब्राझीलने चारपैकी 3 लढती जिंकल्या तर 2005 मधील प्रेंडली लढत अनिर्णित राखली होती. तीनपैकी दोन विजय त्यांनी विश्वचषकात मिळविले आहेत. 2006 मध्ये पहिला व 2014 स्पर्धेतील सामना ब्राझीलने ज्ंिाकला होता. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी क्रोएशियाला ब्राझीलवर पहिला विजय मिळविण्याचे आव्हान पेलावे लागेल.

अर्जेन्टिना-नेदरलँड्स आमनेसामने

या विश्वचषकातील दुसरी उपांत्यपूर्व लढत अर्जेन्टिना व नेदरलँड्स यांच्यात होणार असून दोन्ही संघ ताकदीने तुल्यबळ वाटतात. अर्जेन्टिनाची जमेची बाजू म्हणजे यापूर्वी त्यांनी दोनदा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे तर नेदरलँड्सला तीन वेळा अंतिम फेरी गाठूनही आजवर एकदादेखील ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. हा सामना म्हणजे महान फॉरवर्ड लायोनेल मेस्सी व उत्कृष्ट डिफेंडर व्हर्जिल व्हान डिक यांच्यातील ही जुगलबंदी ठरण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अर्जेन्टिनाचे युवा मॅनेजर, पहिल्याच मोठय़ा स्पर्धेत सहभागी झालेले 44 वर्षीय लायोनेल स्कॅलोनी व नेदरलँड्सचे 71 वर्षीय अनुभवी लुईस व्हान गाल यांच्यातील डावपेचांची जुगलबंदीही रंगण्याची अपेक्षा आहे. अर्जेन्टिनाने 1978 व 1986 मध्ये जेतेपद मिळविले होते. नेदरलँड्स तीनवेळचे अपयश पुसून टाकण्यासाठी प्रयत्नशील असल्याने अर्जेन्टिनाला हा संघ भारी पडण्याची शक्यता आहे.

Related Stories

इशानसह ‘सूर्य’ तळपला, तरीही मुंबई ‘ओव्हर अँड आऊट’!

Patil_p

फिलिपाईन्स पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

Patil_p

इंग्लंड-पाक दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

फायनलमध्ये धडक हीच चेन्नई-दिल्लीची महत्त्वाकांक्षा!

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर मालिका विजय

Patil_p

कॅस्पर रुडची ग्रँडस्लॅम फायनलमध्ये धडक

Patil_p