वृत्तसंस्था/ बर्लिन
आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये वर्चस्व ठेवणाऱया ब्राझील संघाला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकून देणारा अव्वल माजी फुटबॉलपटू काका आता मॅरेथॉनमध्ये पदार्पण करणार असून येत्या रविवारी येथे होणाऱया बर्लिन मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच भाग घेणार आहे.
ब्राझीलचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू काकाने 2017 साली या क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्याने काही काळ रिअल माद्रिद आणि एसी मिलान फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. काकाच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना सुमारे 45 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. मॅरेथॉन क्षेत्रात धावण्यासाठी आपल्याला आपल्या वडिलांकडून प्रोत्साहन मिळाल्याचे काकाने शुक्रवारी बर्लिन मॅरेथॉन संदर्भातील आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. काकाचे वडील कोरोना समस्येतून आता पूर्णपणे बरे झाले असून बर्लिन मॅरेथॉनमध्ये काकाचे वडील, भाऊही सहभागी होणार आहेत. 2002 साली झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविणाऱया ब्राझील संघात काकाचा समावेश होता.