Tarun Bharat

ब्राझीलची बिटेझ माईया उपांत्यफेरीत

Advertisements

वृत्तसंस्था /मॉन्ट्रीयल (कॅनडा)

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या टोरँटो खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत ब्राझीलच्या बिटेझ हेदाद माईया हिने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना स्विसच्या बेनसिकचा पराभव केला.

शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात माईयाने बेनसिकचा 2-6, 6-3, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. माईया आणि झेकची प्लिसकोव्हा यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल. प्लिसकोव्हाने चीनच्या झेंग क्विनवेनचा 4-6, 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. या सामन्यात ब्राझीलच्या 26 वषीय माईयाने तिसऱया फेरीत पोलंडच्या टॉपसिडेड स्वायटेकला पराभवाचा धक्का दिला होता.

Related Stories

गुरुराजा पुजारीला 61 किलो वजनगटात कांस्य

Patil_p

कझाकस्तानमधील लीग फुटबॉल स्पर्धा तहकूब

Patil_p

रोहितच्या वादळात ऑस्ट्रेलिया भुईसपाट!

Patil_p

आशियाई सायकलिंग स्पर्धेत भारताला आणखी दोन कांस्यपदके

Patil_p

डुप्लांटिस, रोजास वर्षांतील सर्वोत्तम ऍथलीट्स

Patil_p

राजस्थानचा ‘वनवास’ संपुष्टात येणार का?

Patil_p
error: Content is protected !!