6 वर्षांपर्यंत चालले डेटिंग
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी हे 6 वर्षांपासून परस्परांना डेट करत होते, परंतु आता दोघेही वेगळे झाले आहेत. दोघांचे ब्रेकअप चालू वर्षाच्या प्रारंभी झाल्याचे समजते. मागील एक वर्षापासून दोघांच्या नात्यात उतार-चढाव येत होते. टायगर आणि दिशाने कधीच अधिकृतपणे स्वतःच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली नव्हती. परंतु दोघेही अनेकदा एकत्र दिसून येत होते.
टायगर आणि दिशा आता एकत्र नाहीत. दोघेही आता सिंगल आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी स्वतःचे रिलेशनशिप संपविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या ब्रेकअपबद्दल काही आठवडय़ांपूर्वीच कळले. सध्या टायगर स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करत असून लंडनमध्ये चित्रिकरण करत आहे. तो दिशासोबतच्या ब्रेकअपमुळे फारसा प्रभावित झाला नसल्याचे त्याच्या मित्राने सांगितले.
दिशा लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटात दिसून येणार आहे. तर टायगर हा ‘गणपत’, ‘बागी 4’ या चित्रपटांमधून झळकणार आहे. दिशाला यापूर्वी ‘राधे ः योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात पाहिले गेले होते.