स्फोटानंतर प्रचंड आग ः युद्धकाळात महत्त्वाची भूमिका बजावणारा पूल
खार्किव्ह / वृत्तसंस्था
रशियाला क्रिमियाशी जोडणाऱया पुलावर शनिवारी स्फोट घडवण्यात आला. या स्फोटानंतर पुलाला आग लागल्यानंतर त्याचा काही भाग कोसळला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पुलावर धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या घटनेच्या काही तास आधी युपेनमधील खार्किव्ह या पूर्वेकडील शहरात अनेक शक्तिशाली स्फोट झाले. मात्र, पुलावरील स्फोटाबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. या पुलाद्वारे 2014 मध्ये रशियाने क्रिमियाला जोडले होते आणि युपेनसोबत सुरू असलेल्या युद्धकाळात हा पूल महत्त्वाची भूमिका बजावत होता.
पुलावरून जाणाऱया मालवाहू टेनच्या डब्यांनाही आग लागली आणि पुलाचे दोन भाग अर्धवट कोसळले. या घटनेनंतर वाहतूक बंद करण्यात आली आहे. आग विझवण्याचे काम सुरू होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये आगीमुळे पुलाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. पूर्व युपेनच्या खार्किव शहरात शनिवारी पहाटे झालेल्या स्फोटांनंतर काही तासांनी आग लागली आणि आकाशात धुराचे लोट पसरले. पहाटे झालेला स्फोट हा शहराच्या मध्यभागी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा परिणाम होता. स्फोटांमुळे शहरातील वैद्यकीय संस्था आणि अनिवासी इमारतीला आग लागली. जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही, असे खार्किव्हचे महापौर इहोर तेरेखोव्ह यांनी टेलिग्रामवर सांगितले.