उद्धव ठाकरे यांच्या दोन ‘बेकायदेशीर’ बंगल्यांवर लवकरच बृहन्मुबई महानगर पालिका लवकरच कारवाई करेल, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे गटाचे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री नारायण राणे म्हणाले, “मी कोणतीही तक्रार करणार नसून व्यक्तीगत टिकेवर विश्वास ठेवत नाही, परंतु ‘कर्तव्यदक्ष’ अधिकारी अशा बेकायदेशीर गोष्टींकडे लक्ष देतील” असेही राणे यांनी सांगितले.
बांद्रा पूर्व या ठिकाणी असलेल्या मातोश्री आणि मातोश्री- 2 या दोन बंगल्यांबाबत बोलताना हे दोन्ही बंगले बेकायदेशीर असल्याचा आरोप मंत्री नारायण राणे यांनी केला. तसेच या बंगल्यांवर लवकरात लवकर महानगर पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील महिला कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या घटनेवर ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ गृहमंत्री असल्याची टिका केली. त्यांनंतर मंत्री नारायण राणे यांनी माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.