Tarun Bharat

‘राज ठाकरे चूहा है’ म्हणणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार, मनसे विरोध करणार?

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत त्यांना उंदीर म्हणणारे उत्तरप्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) पुण्यात येणार आहेत. त्यामुळे मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, मनसे बृजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नसल्याचे पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने 15 जानेवारीला बृजभूषण सिंह पुण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी कोणतंही भाष्य करु नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे बृजभूषण यांच्या दौऱ्याला मनसेकडून कोणताही विरोध होणार नाही.

अधिक वाचा : म्हाडाच्या परीक्षेत डमी उमेदवार; 60 मुन्नाभाईंवर गुन्हा

यासंदर्भात बोलताना वसंत मोरे म्हणाले, बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंना तात्विक विरोध केला होता. याचा अर्थ त्यांना अयोध्येत येऊ दिलं नाही, असा नाही. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे अयोध्येला गेले नव्हते. मात्र, मनसैनिकांनी त्याच दिवशी आयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं. राज ठाकरेंना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अडवण्याची कोणाच्यात ताकद नाही. आमच्या अंगाला दहा वर्ष महाराष्ट्राची लाल माती लागली आहे, आम्हालाही रंग दाखवता आला असता, पण राज ठाकरेंचे आदेश आहेत, त्यामुळे काही बोलता येणार नाही, असं वसंत मोरे म्हणाले.

Related Stories

कोरोना रुग्णालाच रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची वणवण (व्हिडिओ)

Archana Banage

मुंबई : भायखळा जेलमधील 38 कैद्यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

जवाहरनगरातील आर. सी. गँगला मोका

Archana Banage

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मंगळवार दि. 26 रोजी सायकल रॅलीचे आयोजन

Patil_p

भाजप अधिक बळकट होण्यास काँग्रेस जबाबदार – ममता बॅनर्जी

Archana Banage

हुतात्मा स्मारकासमोर टपऱयांमध्ये मटका बोकाळला

Patil_p