Brilliant success of Sarvesh Prabhukhanolkar in CA final exam
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मार्फत नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. अंतीम परीक्षेत वेतोरे गावचा सुपुत्र आणि वाडीवरावडे गावचा रहिवासी सर्वेश दिलीप प्रभुखानोलकर याने यश संपादन केले. यासाठी त्याला सी.ए. सागर तेली, कुडाळ यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली.
सर्वेशचे शालेय शिक्षण प्राथमिक शाळा राणी लक्ष्मी, मठ नं.१, वजराट नं.१ येथे झाले . माध्यमिक शिक्षण वेतोरे हायस्कूल व पदवी पर्यंतचे शिक्षण कुडाळ येथे झाले . यापूर्वी शिष्यवृत्ती, १२ वी परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत येण्याचा मान त्याने मिळविलेला आहे .वेतोरे केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री .दिलीप प्रभुखानोलकर आणि गोवेरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा प्रभुखानोलकर यांचा तो मुलगा , तर अॅड. भुवनेश प्रभु खानोलकर यांचा तो भाऊ होय.
सावंतवाडी / प्रतिनिधी