बोरिस जॉन्सन भारतात दाखल : मोदींसोबत आज उच्चस्तरीय बैठक, व्यापारविषयक करारांसह द्विपक्षीय सहकार्यावर भर
- धोरणात्मक संरक्षण, आर्थिक भागिदारीवर चर्चा अपेक्षित
- संयुक्त व्यापार व गुंतवणुकीच्या प्रस्तावांची घोषणा शक्य
- धोरणात्मक आणि व्यावसायिक सहकार्याचा रोडमॅप ठरणार
नवी दिल्ली, अहमदाबाद / वृत्तसंस्था
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत दौऱयासाठी गुरुवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले. येथे पोहोचल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी त्यांनी वडोदरा येथे जेसीबी निर्मिती बुलडोझरच्या नवीन युनिटचे उद्घाटन केले. तसेच साबरमतीत आश्रमाला भेट देत चरखाही चालवला. रात्री उशिरा ते नवी दिल्लीत पोहोचले असून शुक्रवारी दुपारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा करतील. बदलती जागतिक व्यवस्था आणि युपेन-रशिया युद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेले बदल पाहता भारत आणि ब्रिटन आपले द्विपक्षीय संबंध कसे पुढे नेतील, हा या नेत्यांमधील चर्चेचा महत्त्वाचा भाग असणार आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध आणि व्यापार वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गेल्यावषी त्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंधांसाठी 2030 वर्षासाठी काही महत्त्वाची उद्दिष्टे निश्चित केली होती, ज्याचा आढावा शुक्रवारी चर्चेचा महत्त्वाचा भाग असणार आहे. दोन्ही देशांमध्ये एक अब्ज ब्रिटिश पौंड (सुमारे 9,960 कोटी रुपये) गुंतवणुकीचे करार होण्याची शक्मयता आहे. तसेच ग्रीन टेक्नॉलॉजी अर्थात पर्यावरणाचे रक्षण करणाऱया तंत्रज्ञानाबाबतही काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात येणार आहेत.
रशिया-युक्रेनप्रश्नी भारतावर दबाव नाही
जॉन्सन यांनी भारताचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आणि अहमदाबादमध्ये उतरल्यानंतर दोन महत्त्वाचे संकेत दिले आहेत. प्रथम, त्यांचा देश युपेन-रशिया युद्धावर भारतावर दबाव आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही. काही दशकांपूर्वी ब्रिटन आणि रशिया यांच्यात जसे ऐतिहासिकदृष्टय़ा विशेष संबंध आहे तसेच रशिया-भारतातील विशेष संबंध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत मोदींशी चर्चा करताना विशेष काळजी घेतली जाणार आहे. रशियाच्या युपेनवरील हल्ल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाच्या बाजूने मतदान न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जॉन्सन सरकारमधील काही वरि÷ मंत्र्यांनी टीकास्त्र सोडले होते. मात्र, याप्रश्नी आता भारतावर दबाव आणला जाणार नसल्याचे जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे.
नवउद्योजकांना संधी मिळणार
ब्रिटन भारतासोबत औद्योगिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर अधिक भर देत आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक भारतीय व्यावसायिकांना ब्रिटनमध्ये आमंत्रित केलेले आहे. या लाभासाठी भारतीयांना व्हिसा देण्याच्या पद्धतीतही सुधारणा केल्या आहेत. ब्रिटिश सरकारने सुशिक्षित, प्रशिक्षित व्यावसायिकांना दिलेल्या व्हिसापैकी 40 टक्के व्हिसा भारतीयांना दिल्याचे गेल्या वषीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
नव्या गुंतवणुकीवर भर
ब्रिटनमध्ये विशेषतः आयटी क्षेत्र आणि प्रोग्रामिंगमध्ये व्यावसायिकांची मोठी कमतरता आहे. अर्थव्यवस्थेत हजारो कामगारांची कमतरता आहे. मी नेहमीच बाहेरच्या व्यावसायिकांना काम करू देण्याच्या बाजूने आलो आहे. भारतीय कामगारांप्रती या मवाळपणाचे एक कारण म्हणजे भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. भारतीय कंपन्यांकडून एक अब्ज पौंडांची नवीन गुंतवणूक करण्यात येत असून, त्यामुळे ब्रिटनमध्ये 11,000 नवीन रोजगार निर्माण होतील, असे ब्रिटिश उच्चायुक्तांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत मोदी आणि जॉन्सन यांच्यात होणाऱया शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंधांवर अधिक लक्ष दिले जाईल, असे स्पष्ट संकेत दोन्ही बाजूंकडून मिळाले आहेत.
वडोदरा येथे जेसीबी युनिटचे उद्घाटन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दोन दिवसीय भारत दौरा गुरुवारपासून गुजरातमधून सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी त्यांनी गुजरातमधील हलोल, वडोदरा येथे जेसीबी कंपनीच्या नवीन युनिटचे उद्घाटन केले. या युनिटमध्ये बुलडोझरसह इतर बांधकाम उपकरणे तयार केली जातील. जेसीबी कंपनीचा भारतातील हा सहावा प्रकल्प आहे. या उद्घाटनप्रसंगी जॉन्सन यांनी जेसीबीचे स्टेरिंगही हाती घेत सर्वांची मने जिंकली. या प्रकल्पासाठी सुमारे 650 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
साबरमती आश्रमाला भेट
साबरमती आश्रमात पोहोचल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी बापूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर चरका फिरवून सूत कातले. महात्मा गांधी या विलक्षण माणसाच्या आश्रमाला भेट देणे माझ्यासाठी बहुमूल्य असल्याचे ‘चार शब्द’ त्यांनी टिपणवहीत लिहिले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. साबरमती आश्रमात त्यांना महात्मा गांधींच्या शिष्या मॅडलीन स्लेड उर्फ मीराबेन यांचे आत्मचरित्र ‘द स्पिरिट्स पिलग्रिमेज’ भेट देण्यात आले. हे पुस्तक महात्मा गांधींच्या दोन पुस्तकांपैकी एक आहे, जे कधीही प्रकाशित झाले नव्हते. साबरमती आश्रमानंतर ते उद्योगपती गौतम अदानी यांना भेटण्यासाठी अदानी टाऊनशिपमध्येही गेले होते. येथे त्यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली. याप्रसंगी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञानामध्ये ब्रिटनच्या कंपन्यांच्या सहकार्याबद्दल माहिती दिली.