Tarun Bharat

ब्रिटनची रॅडुकानू स्पर्धेतून बाहेर

Advertisements

वृत्तसंस्था/ सेऊल

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कोरिया खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शनिवारी एकेरीच्या उपांत्य सामन्यात ब्रिटनची 19 वर्षीय महिला टेनिसपटू इमा रॅडूकानूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. आता या स्पर्धेत जेलेना ओस्टापेंको आणि इक्टेरिना ऍलेक्सेंड्रोव्हा यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

या स्पर्धेत ब्रिटनच्या रॅडुकानूने दुखापतीमुळे माघार घेतल्याने ओस्टापेंकोला अंतिम फेरीसाठी पुढे चाल मिळाली. उपांत्य फेरीच्या सामन्यात ओस्टापेंकोने पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर रॅडुकानूने दुसरा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली होती. तिसऱया आणि शेवटच्या सेटमध्ये ओस्टापेंको 3-0 अशी आघाडीवर असताना रॅडुकानूने दुखापतीमुळे ही लढत अर्धवट सोडली. 2017 साली ओस्टापेंकोने ही स्पर्धा जिंकली होती तर याच कालावधीत तिने प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. कोरिया स्पर्धेतील दुसऱया उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित ऍलेक्सेंड्रोव्हाने जर्मनीच्या मारियाचा 6-2, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

Related Stories

2020 मधील बॅलन डी ओर पुरस्कार रद्द

Patil_p

शेवटच्या स्थानावरील हैदराबादचा आरसीबीला झटका

Patil_p

इराणच्या वेटलिफ्टरला आठ वर्षानंतर मिळाले ऑलिम्पिक सुवर्णपदक

Patil_p

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा लांबणीवर

Patil_p

भारत-न्यूझीलंड पहिली वनडे आज

Patil_p

सुरक्षितता असेल तर लाळ वापरावर बंदी नसावी

Patil_p
error: Content is protected !!