वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या वॉशिंग्टन खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनची विद्यमान अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेती एम्मा रॅडुकानूने महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष विभागात ब्रिटनच्या डॅनियल इव्हान्सने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
19 वर्षीय रॅडुकानूने कोलंबियाच्या कॅमिला ओसोरिओचा जवळपास तीन तास चाललेल्या लढतीत 7-6 (7-5), 7-6 (7-4) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. रॅडुकानू आणि सॅमसोनोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. सॅमसोनोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या टॉमलिजोनोव्हिकचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
पुरुषांच्या विभागात ब्रिटनच्या 16 व्या मानांकित डॅनियल इव्हान्सने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना अमेरिकेच्या तृतीय मानांकित टेलर फ्रिट्जचा 3-6, 7-6 (8-6), 4-1 असा पराभव केला. दुखापतीमुळे फ्रिजने हा सामना अर्धवट सोडला. जपानच्या निशीओकाने कॅचेनोव्हचा 7-6 (7-2), 7-6 (7-1) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.