सेऊल : डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कोरिया खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या 19 वषीय इमा रॅडुकानूने विकमेयरचा सरळ सेट्समध्ये पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात रॅडुकानूने बेल्जियमच्या अनुभवी विकमेयरचा 6-3, 7-5 असा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. या सामन्यात रॅडुकानूने नऊ बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रॅडुकानूची गाठ पोलंडच्या लिनेटीशी पडणार आहे.