लंडन
ब्रिटनची अंतराळ मोहीम ‘द स्टार्ट मी अप’ अयशस्वी ठरली आहे. मोहीम सुरू करणारी कंपनी वर्जिन ऑर्बिटने याची माहिती दिली आहे. तांत्रिक बिघाडामुळे रॉकेट स्वतःच्या निर्धारित कक्षेत पोहोचू शकलेले नाही. वर्जिन कंपनीने स्वतःच्या एका विमानात बदल करत ते रॉकेटवाहू विमानात रुपांतरित केले होते. या बदलानंतर या विमानाला कॉस्मिक गर्ल नाव देण्यात आले होते. ही अंतराळ मोहीम ब्रिटनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती.