वार्ताहर /कुद्रेमनी
येथील शेतकरी भैरू जोतिबा धामणेकर यांच्या राहत्या घरातून किमती सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. घरफोडीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची नेंद काकती पोलिसांत झाली आहे. गावातील नाईकवाडा अॅप्रोच रस्त्यालगत धामणेकर कुटुंबीयांची घरे आहेत. दुपारच्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून घराच्या समोरील दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दोन खोल्यांचे दरवाजे उघडून दोन्ही ठिकाणी असलेल्या दोन कपाटांतील किमती ऐवज व रोख रकमेची चोरी केली आहे. कपाटातील कपडे, कागदपत्रे विस्कटून टाकण्यात आली होती. दोन तोळ्याची सोन्याची चेन, अंगठी, तीस हजार रुपये रोख रक्कम, लहान मुलांचे चांदीचे पैंजण, नथणी असा ऐवज चोरीला गेल्याची माहिती भैरू धामणेकर यांनी पोलिसांना दिली. काकती पोलीस ठाण्याचे पीएसआय मंजुनाथ, पोलीस निरीक्षक मुरगट्टी यल्लप्पा व मारुती पी. सी. यांनी घरातील चोरी झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत