क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कराटे इंडिया संघटना (केआयओ) द्वारे आयोजित ऑल इंडिया सब ज्युनियर कराटे स्पर्धेत दिल्लीमध्ये फ्लायिंगफीट स्पोर्ट्स कराटे अकादमीचा विद्यार्थी इशान हेरवाडकर काटामध्ये आणि अनन्या शिंदे कुमितेमध्ये कांस्यपदक मिळविले आहे. तर जेनिशा हदिमानी, अर्णव कामण्णवर आणि आराध्या सावंत यांनी कर्नाटकचे प्रतिनिधीत्व केले. बेळगावच्या खेळाडूंनी मिळवलेले हे पहिलेच कराटे अधिकृत राष्ट्रीय पदक आहे. सर्व करटेपटूंना शिहान कीर्ती जीके, विनायक मोरे, चेतन मोरे, ऋतुराज कानुरकर, चेतन मिटागर, स्वप्नील मिरजकर, सोमनाथ हल्याळ, प्रांजली पोटे, अंजली पुजारी, आकाश फगरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.