Tarun Bharat

अभिषेक वर्मा, ज्योती सुरेखा यांना कांस्य

वृत्तसंस्था/ बर्मिंगहम (ब्रिटन)

येथे सुरु असलेल्या विश्व क्रीडा स्पर्धेत भारताचे तिरंदाज अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा यांनी मेक्सिकोच्या अँड्रिया बिकेरा आणि मिगेल बिकेरा यांचा 157-156 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव करत पदक मिळविले. सदर माहिती अखिल भारतीय तिरंदाज संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. विश्व क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत भारताला हे पहिलेच पदक मिळाले आहे. कंपाऊंड तिरंदाजी प्रकारामध्ये भारताचा तिरंदाजपटू अभिषेक वर्माने आतापर्यंत विश्व क्रीडास्पर्धा, विश्व चॅम्पियनशिप, विश्व चषक अंतिम स्पर्धेत, आशियाई क्रीडास्पर्धा आणि आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत पदके मिळविलेली असून असा पराक्रम करणारा तो भारताचा एकमेव तिरंदाज आहे. अभिषेकचे हे 50 आंतरराष्ट्रीय पदक आहे.

बर्मिंगहममधील स्पर्धेत मात्र अभिषेक वर्माचे वैयक्तिक विभागातील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने अमेरिकेचा टॉप सिडेड आणि विश्वविजेता तिरंदाजपटू मिकी स्कोलेसेरला हरविले होते. पण त्यानंतर उपांत्य लढतीत अभिषेक वर्माला फ्रान्सच्या जीन फिलिपने 143-141 असे पराभूत केले. त्यानंतर झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत कॅनडाच्या ख्रिस्तोफर पर्किन्सने अभिषेकचा 148-145 असा पराभव करत कांस्यपदक मिळविले.

Related Stories

बॉक्सिंग डे कसोटीला प्रेक्षक उपस्थितीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न

Patil_p

10 हजार मीटर्समध्ये इथिओपियाचा बरेगा अजिंक्य

Patil_p

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Patil_p

सानिया-शुआई उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

स्वीसच्या वावरिंकाची विजयी सलामी

Patil_p

वॉर्नने निवडलेल्या भारतीय संघाचा गांगुली कर्णधार

Patil_p