मदुराईमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून गुन्हा
वृत्तसंस्था /मदुराई
तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची चाकूने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हिंदू मक्कल काचीच्या कार्यकर्त्याची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली होती. मृत कार्यकत्याचे नाव मणिकंदन आहे. ज्वेलरीचे दुकान बंद करून घरी जात असताना मणिकंदन यांच्यावर अज्ञातांनी चाकूने वार केले होते. या हल्ल्यानंतर मणिकंदन यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आता या हत्येप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी अद्याप कुठल्याच आरोपीला अटक केलेली नाही. तसेच हत्येमागील कारणही स्पष्ट झालेले नाही. दक्षिण भारतात हिंदुत्ववादी नेते तसेच कार्यकर्त्यांवर मागील काही काळात अनेक हल्ले झाले आहेत.