ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी ‘होंडा’ने आपली सर्वाधिक खपाची ‘सीबी शाईन’ ही बाईक अपडेटेड बीएस 6 इंजिनसह भारतात लाँच केली आहे.
या बाईकमध्ये नवीन फ्युअल इंजेक्टेड 125 सीसी इंजिन आणि 5 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे नवीन इंजिन 7500 आरपीएमवर 10.72 बीएचपीची ऊर्जा आणि 6,000 आरपीएमवर 10.9 बीएचपी पीक टॉर्क निर्माण करते. याशिवाय नव्या इंजिनमध्ये सायलेंट स्टार्टरसोबत एनहान्स्ड स्मार्ट पॉवर देण्यात आली आहे. नव्या इंजिनमुळे बाईकची इंधन कार्यक्षमता 14 टक्क्मयांनी वाढली आहे.
बाईकच्या मागे लो-रेजिस्टन्स टय़ुबलेस टायर आहेत. ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिअंट्समध्ये ही बाईक उपलब्ध असेल. रेबेल रेड मेटेलिक, जेनी ग्रे मेटेलिक, ऑथेंटिक ब्लू मॅटेलिक आणि ब्लॅक या चार कलरच्या पर्यायांमध्ये ही बाईक उपलब्ध आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 65 हजारांपासून पुढे आहे.