Tarun Bharat

बीएससीच्या शिक्षणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी/रायबाग: बीएससीच्या शिक्षणाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रायबाग तालुक्यातील यलपरट्टी येथे समोर आली आहे.

निंगण्णा चिदानंद न्हावी (२२) असे मृताचे नाव आहे. मृत तरुण जमखंडी येथील बीएलडी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होता. मात्र 3 दिवसांपूर्वी तो गावी परतला होता आणि आज त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी जेव्हा आईचे डोळे उघडले तेव्हा मुलाला अशा अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला.

आत्महत्येपूर्वी त्याने डेथ नोटही लिहून ठेवली असून, मला माफ करा, मला बीएससीचे शिक्षण घेणे आवडत नव्हते, पण घरची परिस्थिती अशी होती कि नाईलाजाने मला शिकावं लागत होता.

हारुगेरी पोलिस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

फिश-मटण मार्केटमधील गाळय़ांचे सर्वेक्षण

Amit Kulkarni

मनपा अंतिम आरक्षण जाहीर झाल्याची शहरात चर्चा

Amit Kulkarni

मानवी कवटी-हाडे प्रयोगशाळेकडे

Amit Kulkarni

चोर्ला मार्गाचे डांबरीकरण करा

Amit Kulkarni

मनरेगामुळे ग्रामीणच्या विकासाला चालना

Amit Kulkarni

प्रा. जी. के. खडबडी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

Amit Kulkarni