ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या कूचबिहारला लागून असलेल्या भारत-बांग्लादेश सीमेवर शुक्रवारी पहाटे 3 वाजता बांग्लादेशच्या बाजूने काही गो तस्करांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास सुरुवात केली. बीएसएफच्या जवानांनी त्यांना अडवले असता त्यांनी जवानांवर लोखंडी रॉड आणि काठय़ांनी हल्ला केला. अखेर बीएसएफला आपल्या बचावार्थ गोळीबार करावा लागला, ज्यात दोन बांग्लादेशी गो तस्कर ठार झाले.
या घटनेनंतर बीएसएफने निवेदन जारी केले की, आज पहाटे तीनच्या सुमारास कूचबिहारला लागून असलेल्या भारत-बांग्लादेश सीमेवर गो तस्करांनी सीमेवरील वेढा ओलांडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करून पायऱ्या बांधल्या. दरम्यान, बीएसएफने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, तस्करांनी जवानांवर लोखंडी रॉड आणि काठय़ांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. बचावासाठी बीएसएफला गोळीबार करावा लागला ज्यात दोन तस्कर ठार झाले.