Tarun Bharat

बांगलादेश सीमेवर बीएसएफ जवानांवर हल्ला

100 हून अधिक बांगलादेशी नागरिकांचे कृत्य ः 2 जवान गंभीर

वृत्तसंस्था/ बेरहामपूर

आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय शेतकऱयांच्या सुरक्षेकरता तैनात बीएसएफ जवानांवर बांगलादेशी नागरिक अन् गुंडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या जवानांची शस्त्रास्त्रs पळविण्यात आली आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी तेथे धाव घेत दोन्ही जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयात हलविले आहे.

बंगाल प्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टरमध्ये निर्मित निर्मचलर पोस्ट 35 बटालियनच्या भागात ही घटना रविवारी घडली आहे. यासंबंधीचा मुद्दा बॉर्डर गार्ड्स बांगलादेशसमोर उपस्थित करण्यात आला असून ध्वज बैठक बोलाविण्यात आली आहे. बांगलादेशी गुंडांकडून भारतीय शस्त्रास्त्रs प्राप्त करत भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टीने या ध्वजबैठकीत पावले उचलली जाणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्हय़ात मोडणारे हे क्षेत्र बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. बांगलादेशचे नागरिक भारतीय शेतकऱयांच्या पिकाला नुकसान पोहोचविण्यासाठी स्वतःच्या पशूंना जाणूनबुजून शेतांमध्ये सोडत असल्याचा आारेप आहे. पशूंचे निमित्त समोर करत बांगलादेशी नागरिक भारतीय सीमेत अवैध मार्गाने शिरतात. निर्मलचरमधील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर बीएसएफने त्यांच्या सुरक्षेसाठी येथे तात्पुरती चौकी निर्माण केली आहे.

बांगलादेशी गुंड रविवारी घुसखोरी करू पाहत असताना बीएसएफच्या जवानांनी त्यांना रोखले होते. यानंतर काही क्षणातच 100 हून अधिक बांगलादेशी नागरिक आणि गुंडांनी भारतीय सीमेत शिरून जवानांवर काठी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. याप्रकरणी बीएसएफने रानीताला पोलीस स्थानकात एफआयआर नोंदविला आहे.

तस्कर आणि गुन्हेगारांना सीमापार स्वतःच्या अवैध कारवाया करण्यास अपयश आल्यावर त्यांच्याकडून जवानांवर हल्ले करण्यात येतात. यापूर्वी देखील जवानांवर बांगलादेशी गुंडांकडून हल्ले करण्यात आले आहेत, बांगलादेशी तस्कर अन् गुंडांना अवैध कारवाया करण्यापासून रोखण्याचे काम जवान करत असल्याचे साउथ बंगाल प्रंटियरच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

Related Stories

बिहारमध्ये राजकीय ‘महाघमासान’

Patil_p

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीस कोलकातामधून अटक

Tousif Mujawar

आयटीसीचा समभाग नव्या उच्चांकावर

Patil_p

अन्य देशांच्या धर्तीवर दिलासा पॅकेज : सीतारामन

Patil_p

चिमुरडीवर बलात्कार करणाऱयाचा मृत्यू

Amit Kulkarni

भूमीसीमा कायद्यासंबंधी भारताचे चीनवर टीकास्त्र

Patil_p
error: Content is protected !!