Tarun Bharat

बीएसएफने पाडले पाकिस्तानचे ड्रोन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सीमा सुरक्षा दलाच्या महिला शाखेच्या काही सैनिकांनी भारताच्या वायुकक्षेत घुसखोरी केलेले पाकिस्तानचे एक ड्रोन पाडले आहे. या महिला सैनिकांना ‘महिला प्रहारी’ म्हणून ओळखले जाते. या सैनिकांनी हे ड्रोन पाहिल्यानंतर त्याची माहिती सीमा सुरक्षा दलाला कळविली. त्यानंतर हे ड्रोन पाडण्यात आले.

ही घटना मंगळवारी पंजाब राज्यातील अमृतसर या सीमावर्ती शहराजवळ घडली. छतरपूर या खेडय़ानजीक महिला प्रहारी पहारा देत असताना त्यांच्या दृष्टीला हे ‘हेक्झाकॉप्टर’ प्रकारचे ड्रोन पडले. ते पाकिस्तानातून भारताच्या वायुकक्षेत घुसखोरी करत होते. या ड्रोनवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे ते कोसळले.

ड्रोन पाडल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने केलेल्या शोधकार्यात सहा चाकांचे ड्रोन आणि त्याला जोडण्यात आलेली आणि पांढऱया रंगाच्या आवरणात असलेली एक अज्ञात वस्तू हस्तगत करण्यात आली. या वस्तूची तपासणी सुरू आहे. या ड्रोनमधून अमली पदार्थ भारताच्या भूमिवर टाकण्याचा प्रयत्न होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ड्रोनला जोडलेल्या अज्ञात वस्तूची त्या दृष्टीनेही तपासणी सुरू आहे. पाकिस्तानी ड्रोन पाडण्याची गेल्या पाच दिवसांमधील ही दुसरी वेळ आहे. 25 नोव्हेंबरलाही पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले होते.

Related Stories

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

मिथुन चक्रवर्ती निश्चित, गांगुलींबद्दल उत्सुकता

Patil_p

देशात दिवसभरात 11 हजार नवे रुग्ण

Patil_p

लॉकडाऊनमध्ये जनतेला ‘शॉक’

Patil_p

एक पाऊल मागे घेतले, पण पुन्हा पुढे जाणार!

Patil_p

आग्रा : आठवड्यातील 2 दिवसीय लॉकडाऊनचे नियम आता अधिक कडक

Tousif Mujawar