पेन्शन, थकलेले वैद्यकीय बिल यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ऑल इंडिया पेन्शनर्स असोसिएशनतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
कॅम्प येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयात पेन्शनर धारकांनी आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्नाटक राज्यातील 7000 हून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.