Tarun Bharat

द्रौपदी मुर्मू यांना बसपाचा पाठिंबा

Advertisements

लखनौ / वृत्तसंस्था

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. आम्हाला कोणालाही पाठिंबा देण्याचा अधिकार असल्याचे मायावतींनी शनिवारी जाहीर केले. बसपाच्या पाठिंब्यामुळे रालोआ उमेदवाराचे पारडे अधिकच जड झाले असून विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी विरोधकांनी बसपाला बैठकीपासून दूर ठेवले. त्यातून त्यांची विचारसरणी दिसून येते. आम्ही रालोआच्या नव्हे तर आदिवासींच्या बाजूने मतदान करू. बसप हा पक्ष कोणावरही अवलंबून नाही, असे स्पष्टीकरण मायावतींनी दिले आहे.

Related Stories

‘हे’ प्राध्यापक करणार अयोध्येतील मशिदीचे डिझाईन

datta jadhav

बाहुबली अतीक अहमदच्या वाढल्या अडचणी

Patil_p

अर्थव्यवस्था आता झेपावण्याच्या पवित्र्यात

Patil_p

विवाह समारंभांवर मार्शलची राहणार नजर

Patil_p

चेन्नईत कोरोनामुळे 9 वर्षीय सिंहिणीचा मृत्यू

Patil_p

उत्तर प्रदेश : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!