Tarun Bharat

बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही!

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी काल दिवसभराच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यावेळी राऊत यांच्या घराबाहेर जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही राऊतांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.

आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गमावलेले हक्क अन्याय करणाऱ्या लोकांच्या विवेकबुद्धीला आवाहन करून परत मिळत नसतात, तर सतत संघर्षाने मिळतात. बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर”

राज्यातील राजकीय घडामोडी आणि सद्यपरिस्थितीला अनुसरुन आव्हाड यांनी हे ट्विट केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य आहे. दरम्यान, थोडय़ाच वेळात संजय राऊत यांना जेजे रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी नेण्यात येणार आहे. त्यानंतर 11:30 वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; घरगुती गॅस सिलिंडरच्या…

Related Stories

सरकारच्या आदेशाशिवाय खाजगी शाळांनी फी वाढवल्यास होणार कारवाई : मनीष सिसोदिया

prashant_c

सातारा पालिकेकडून प्लास्टिक वापरणाऱया दुकानांवर कारवाई

Patil_p

रोहित पवारांचा गनिमी कावा, बेळगावात दाखल

Rohit Salunke

स्थलांतरीतांच्या सुविधासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘आपत्ती निधी’तून खर्च करण्यास मान्यता

Archana Banage

शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द ; ‘हे’ आहे कारण…

Tousif Mujawar

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर अपहाराचा गुन्हा

datta jadhav